जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रामदास कॉलनीत राहणाऱ्या व्यापाऱ्याला फटाक्यांची ऑर्डर देण्याचे बहाणा करून २ लाख ४१ हजार ५०० रूपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनंजय लक्ष्मण पाटील (वय-४८) रा. रामदास कॉलनी, आकाशवाणी चौक जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्यांना एका अनोळखी व्हॉटसॲप नंबरवरून २० सप्टेंबर रोजी शेखर माखाजी फटाके डिलर नावाने एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्यांनी धनंजय पाटील यांचा विश्वास संपादन करून फटक्यांची ऑर्डर घेतली. त्यानंतर धनंजय पाटील यांनी २ लाख ४१ हजार ५०० रूपये ऑनलाईन पध्दतीने टाकले. दरम्यान, ऑर्डर घेवून दिलेल्या मुदतीत फटाके न मिळाल्याने धनंजय पाटील यांनी मंगळवारी २७ सप्टेंबर रोजी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.
व्यापाऱ्याला लावला २ लाख ४१ हजाराचा ऑनलाईन चुना !
2 years ago
No Comments