व्यंकय्या नायडू आणि उमा भारतींबद्दल सोशल मीडीयामध्ये अपमानकारक पोस्ट ; एकाविरुद्ध गुन्हा

पुणे (वृत्तसंस्था) देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि भाजपा नेत्या उमा भारती यांच्याबद्दल सोशल मीडीयामध्ये अपमानकारक पोस्ट केल्याबद्दल बारामती पोलिस स्टेशनमध्ये एका अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मागील काही दिवसांपूर्वी एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोना संकटकाळात अयोद्धेमध्ये राम मंदिर भूमिपूजन आणि शिलान्यास या कार्यक्रमावरून आपले मत मांडले होते. त्यावर पवारांचे वक्तव्य भगवान राम विरोधी असल्याची प्रतिक्रिया भाजपा नेत्या उमा भारती यांनी दिली होती. तर राज्यभेमध्ये भाजपा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ‘जय शिवाजी जय भवानी’ घोषणा दिल्यानंतर सभापती आणि राष्ट्रपती व्यकंय्या नायडू यांनी शपथविधी दरम्यान घोषणा देऊ नका असा दम भरल्यानंतर महाराष्ट्रामध्ये मोठे वादंग निर्माण झाले होते. यावरून उमा भारती आणि व्यंकय्या नायडू या दोघं नेत्यांविषयी सोशल मीडियात टीका होत होती. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तक्रारदार एबीव्हीपी कार्यकर्ता असून आयपीसी सेक्शन ५०५ (२) अंतर्गत ही एफआयआर नोंदवण्यात आली आहे.

Protected Content