वेल्हाळे तलाव खोलीकरणास मंजुरी

भुसावळ । तालुक्यातील वेल्हाळा येथील तलावाच्या खोलीकरणाला जिल्हाधिकार्‍यांनी मंजुरी दिली आहे.

वेल्हाळे येथील तलावाचे खोलीकरण करावे, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा संघटक ज्ञानेश्‍वर आमले व शेतकर्‍यांनी आंदोलन केले होते. याची दखल घेत प्रशासनाने २५ हजार ब्रास खोदकामाला मंजुरी दिली आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातून तलावाच्या खोलीकरणाचे आदेश निघाले. यामुळे वेल्हाळे तलावातील २५ हजार ब्रास गौण खनिज खोदकाम करुन २८ फेब्रुवारीपर्यंत उचलले जाईल. यातून निघालेला गाळ व गौण खनिज महामार्ग चौपदरीकरण कामासाठी भराव म्हणून वापरला जाणार आहे. या कामासाठी गौण खनिज उचलासाठी दिलेल्या स्थळाची जलसंधारण विभागाकडून सर्वेक्षण करुन उत्खननाची खोली, रुंदी व लांबी निश्‍चित करण्याची जबाबदारी ठेकेदाराची असेल. नैसर्गिक संपत्ती व पर्यावरणास धोका होणार नाही खबरदारी घेत गौण खनिज उत्खनन करावे, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.

Add Comment

Protected Content