वरणगाव दत्तात्रय गुरव । भुसावळ तालुक्यातील वेल्हाळा गावातील लखोबाचे जुने मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी व सुशोभीकरणासाठी महाजनकोने लाखोचा भ्रष्टाचार केल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भात वरणगाव येथील माहिती अधिकार कार्यकर्ते एकनाथ पाटील यांनी हा प्रकार समोर आणला आहे.
सविस्तर माहिती अशी की, सन 2017 साली दीपनगर येथील महाजनको या प्रकल्पाच्या वतीने साई सप्लायर्स या कंपनीला भुसावळ तालुक्यातील वेल्हाळा येथील लखवा मंदिराचे सुशोभीकरणाचे व जीर्णोद्धाराचे काम देण्यात आले होते. या कामासाठी सुमारे 16 लाख 75 हजार रुपयेचे टेंडर काढण्यात आले होते. याची निविदाही निघाले आणि साई सप्लायर या कंपनीने हे टेंडर घेतले परंतु महाजनकोच्या अधिकाऱ्यांची हाताशी धरून साई सप्लायरने थातूरमातूर काम करत खूप मोठा भ्रष्टाचार केला आहे. या ठिकाणी 40 ते 50 हजार रुपयांचे सुद्धा काम केले नसल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते एकनाथ पाटील करत आहे. सध्या लखोबा मंदिराचे जीर्णोद्धार व शुद्धीकरण कसल्याच प्रकारे झाले नसल्याचे चित्र समोर पहावयास मिळत आहे .या सर्व प्रकाराची माहिती ऊर्जामंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना समक्ष भेटून देणार असल्याचेही पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदार आवर्ती कारवाई करण्याची मागणीही पाटील यांनी केली आहे