चाळीसगाव, प्रतिनिधी । प्रदर्शित झालेल्या वेब सिरीजमध्ये मेहतर वाल्मिकी व चर्मकार समाजाविषयी अश्लील शब्दप्रयोग करण्यात आले आहे. त्यामुळे या वेब सिरीजच्या दिग्दर्शक, कलाकार व संबंधित व्यक्तींवर ॲट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गंभीर कारवाई व्हावी अशी मागणी निवेदनाद्वारे उपेक्षित दलित सामाजिक परिषदेतर्फे करण्यात आले. यावेळी तहसीलदार व शहर पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
झी-५ निर्मित माफिया हि वेब सिरीज सन २०२० मध्ये प्रदर्शित झाली आहे. मात्र या वेब सिरीजमध्ये देशाचे संविधान आरक्षण, मेहतर वाल्मिकी व चर्मकार समाजाविषयी अश्लील शब्दप्रयोग करण्यात आले आहे. त्यामुळे दिग्दर्शक, कलाकार व संबंधित व्यक्तींवर ॲट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गंभीर कारवाई व्हावी. या आशयाचे निवेदन तहसीलदार अमोल मोरे व शहर पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांना उपेक्षित दलित सामाजिक परिषदेतर्फे आज देण्यात आले. या वेब सिरीजमध्ये जातीवाचक शब्दप्रयोग असल्याने समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहे. लवकरात लवकर कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष तुषार मधूकर नकवाल, तालुकाध्यक्ष संजय बागरे, शहराध्यक्ष राहूल मधूकर नकवाल, आनंद गांगुर्डे व रामकृष्णा सोनवणे आदींच्या सह्या केल्या आहेत.