जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील तरसोद येथे महिलेचे बंद घर फोडून चोरट्यांनी लोकर सह दागिने असा ऐकून 26 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तरसोद गावात बौद्धवाडा परिसरात ताई बाई अशोक सोनवणे वय 65 या वृद्ध महिला वास्तव्यास आहेत. 22 मार्च रोजी रात्री दहा ते 23 मार्च रोजी सकाळी ९ वाजे दरम्यान ताईबाई यांचे घर बंद होते. घर बंद असल्याचे संधी साधत चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला व घरातील वीस हजार रुपये रोख तसेच सहा हजार रुपयांच्या दोन ग्रॅम च्या सोन्याच्या बाह्या असा एकूण 26 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. घटना समोर आल्यानंतर ताई बाई सोनवणे यांनी याप्रकरणी गुरुवारी दुपारी पाच वाजेच्या सुमारास नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अतुल महाजन हे करीत आहेत.