जळगाव, प्रतिनिधी । वृद्धांची आठवण राजकारणात मतदानापुरतीच नको, त्यांना जपण्याचे भान हवे असे प्रतिपादन फेस्कॉमचे माजी अध्यक्ष डी. टी.चौधरी यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजशी बोलतांना केले. ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आले असतांना बोलत होते.
राज्यात साडे नऊ लाख वृद्ध ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद असल्याची माहिती माजी अध्यक्ष डी. टी. चौधरी यांनी दिली. जेष्ठ नागरिक संघ हा वृद्धांसाठी काम करीत असून वृद्धांना मदतीची गरज असते. अशा वेळी विद्यापीठाने राबविलेली जेष्ठ नागरिक सहाय्यता दूत संकल्पना प्रशंसनीय असल्याचे मत श्री. चौधरी यांनी मांडले. एकत्र कुटुंब पद्धतीत जेष्ठ नागरिकांना कमी प्रमाणत समस्या भेडसावत होत्या. मात्र, आधुनिक काळात विभक्त कुटुंब पद्धती व शहरीकरणामुळे जेष्ठ नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ झाली असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले. यासह जेष्ठ नागरिकांच्या समस्येबाबत श्री. चौधरी यांनी आपल्या मुलाखतीत उहापोह केला आहे. ही विशेष मुलाखत सुभाष पवार यांनी घेतली आहे. यासह प्र. कुलगुरू बी. व्ही. पवार यांनी जेष्ठ नागरिक सहाय्यता दूत प्रशिक्षण उपक्रमाबाबत माहिती दिली आहे.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/176059241159085