वुमेन्स ॲन्ड चाईल्ड केअर प्लस संस्थे मार्फत कष्टकरी महिलांचा सन्मान

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील वुमेन्स ॲन्ड चाईल्ड केअर प्लस या संस्थे मार्फत बेंडाळे नगरातील कष्टकरी महिलांचा साड्या देवून सन्मान करण्यात आला.

 

बेंडाळे नगरातील गणपती महादेव मंदिरात सफाई कामगार महिला तसेच कपडे भांडी करणा-या सुमारे ४०-५० कष्टकरी महिलांना साडी भेट देऊन त्यांच्या कष्टाचा सन्मान करण्यात आला. यावेळी देवभूमी प्रतिष्ठान आणि ओम श्री गणेश महिला मंडळाच्या मंदाताई सोनवणे मालती पाटील, मंगला सुर्यवंशी, मीना औटी, शारदा पाटील, अलका पाटील , आशा पवार, उज्वला पवार, शोभा पाटील, तसेच डॉ.शंकरलाल सोनवणे, दिलीप सुर्यवंशी, ईश्वर पाटील, सुरेश औटी, राजेश्वर कुंभार, पारसमल भंडारी, संजय नेरपगार यांनी कार्यक्रमाचे नियोजन अतिशय उत्तम केले होते. या सगळ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला.

 

 

कार्यक्रमात प्रारंभी वुमेन्स ॲन्ड चाईल्ड केअर प्लसच्या अध्यक्ष शांता वाणी यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याची माहिती दिली आणि कष्टकरी महिलांनी आपली मुलगी आणि सुनेलाही शिकवावे आणि स्वतःच्या पायावर उभे करावे सक्षम बनवावे म्हणजे त्यांना कष्ट करावे लागणार नाही असा सल्ला  उपस्थित महिलांना दिला. आणि  एनकेटी चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत विधवा महिलांचे पुनर्वसन,आपदग्रस्तांचा संसार उभा करणे, गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देणे, होतकरू महिलांना शिलाई मशीन, साड्या कपडे देणे, मंदिरांचा जीर्णोद्धार असे समाजोपयोगी कामे नेहमी करीत असल्याचे सांगितले. तसेच मंदाताई सोनवणे यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रयोजन सांगितले.

Protected Content