वीर भगवान एकलव्य यांच्या जयंतीनिमित्त प्राणप्रतिष्ठा सोहळा

 

चाळीसगाव, प्रतिनिधी । पिंपळवाढ म्हाळसा येथील आदिवासी भिल्ल समाजाचे दैवत वीर एकलव्य भगवान यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी भिल्ल समाजाच्या वतीने वीर एकलव्य भगवान यांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा चाळीसगाव तालुक्याचे आमदार व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. 

आदिवासी भिल्ल समाजाचे दैवत वीर एकलव्य भगवान यांच्या जयंतीनिमित्त चौथऱ्यावर स्थापित वीर एकलव्य भगवान यांच्या मूर्तीला आमदार मंगेश चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सरपंच भाऊसाहेब पाटील, युवा मोर्चा माजी तालुकाध्यक्ष रोहन सूर्यवंशी, भाजपा तालुका सरचिटणीस अमोल चव्हाण, युवा मोर्चाचे दिनेश महाजन, कैलास नाना, माजी सरपंच विजय अहिरे, प्रकाश पाटील, उपसरपंच प्रदीप पाटील, माजी उपसरपंच मुकेश जाधव, अण्णा महाले, माजी पंचायत समिती सदस्य सतीश अहिरे, सुशील पाटील, भाऊसाहेब भिल्ल, संजय माळी, नाना माळी, बालू भिल्ल, ग्रामपंचायत सदस्य दगडू भिल्ल, माजी उपसरपंच विठ्ठल नाईक, भाऊसाहेब भिल्ल, विकास भिल्ल, तामसवाडी येथील अर्जुन दळवी, शाम पाटील, तुषार पाटील, भागवत पाटील, नाना पाटील आदी उपस्थित होते.

आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, आदिवासी भिल्ल समाज हा पूर्वीपासूनच लढवय्या आणि या मातीशी इमान राखणारा समाज असल्याचे अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत. वीर एकलव्य भगवान हे त्याकाळातील सर्वोत्कृष्ट धनुर्धर होते. मात्र नियतीने त्यांच्यावर मोठा अन्याय केला आणि त्यांना गुरुदक्षिणा म्हणून द्रोणाचार्य यांना आपला अंगठा द्यावा लागला. आदिवासी समाजाचे नायक, आद्य क्रांतिकारक तंट्यामामा भिल्ल यांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारून स्वातंत्र्य लढ्याचे रणशिंग फुंकले. आज काळ बदलत आहे. तसे आदिवासी समाजात देखील बदल घडत आहेत. त्यामुळे वीर भगवान एकलव्य यांची प्रेरणा घेऊन आदिवासी तरुणांनी नोकरी, उद्योग, व्यवसाय तसेच प्रत्येक क्षेत्रात उन्नती साधावी असे आ. मंगेश चव्हाण यांनी आवाहन केले. तसेच वैयक्तिक पातळीवर माझी गरज भासल्यास तालुक्याचे लोकप्रतिनिधी या नात्याने आपल्या उन्नतीसाठी शासकीय स्तरावर प्रयत्न करेल असे आश्वासन आ. चव्हाण यांनी दिले.

 

Protected Content