वीज देण्याची थकबाकी वाढल्यास भारनियमन अटळ- ऊर्जामंत्री ना. डॉ नितीन राऊत

खामगाव,लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | वापरलेल्या वीज देयकाचे पैसे न भरल्याने महावितरण आर्थिक संकटात आहे.अशीच थकबाकी वाढल्यास आगामी काळात राज्यातील जनतेला पुन्हा एकदा भारनियमनास समोर जावे लागेल, असा स्पष्ट इशारा राज्याचे ऊर्जामंत्री नामदार डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे आयोजित कार्यक्रमात दिला.

 

महापारेषणच्या २२०के.व्ही.धरणगाव वीज उपकेंद्राचे लोकार्पण आणि महावितरणच्या ३३/११के.व्ही मनसगाव वीज उपकेंद्राचे भूमीपूजन नामदार डॉ. राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, वापरलेल्या वीजेचे पैसे भरणे आपले कर्तव्य आहे. महावितरणला देखील बाहेरून पैसे देऊन वीज खरेदी करावी लागते. याकडे त्यांनी लक्ष वेधले. महापारेषणचे नवीन वीज उपकेंद्र झाल्याने बुलढाणा जिल्ह्यातील सुमारे पाच हजार वीज ग्राहकांना लाभ होणार आहे. शेतकरी बांधवांना दर्जेदार आणि खात्रीशीर वीज पुरवठा यामुळे मिळणार आहे. या वीज उपकेंद्राच्या उभारणीवर १४४ कोटी रुपये खर्च झाले आहे यात १०० एमव्हीए क्षमतेचे दोन रोहित्र लावले आहे. व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषा पवार, आमदार राजेश एकडे, माजी आमदार दिलीप सानंदा,राहुल बोंद्रे, महावितरणचे मुख्य अभियंता अनिल डोये,महापारेषणचे मुख्य अभियंता भीमराव राऊत उपस्थित होते.

Protected Content