विहीरीवरील विद्युत पंपाचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू

जळगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील खेडीखुर्द-अव्हाने येथील ४५ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात काम करत असतांना शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. मयत स्थीतीत त्यांना कुटूंबीयांनी जिल्‍हारुग्णालयात दाखल केले अशोक उत्तम खैरनार असे मृत शेतकऱ्याचे नाव असून तालूका पेालीसांत अकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, अव्हाणे खेडी येथील शेतकरी अशोक उत्तम खैरनार (वय-४५) शेतात नेहमी प्रमाणे काम करत होते. दुपारी विहीरीवरील विद्युत मोटार सुरु करत असतांना त्यांना जोरदार विजेचा धक्का लागून ते फेकले गेले. शेतातील सालदारांसह कुटूंबीयांनी त्यांना तातडीने उपचारार्थ जळगावच्या दिशेने धाव घेतली. दवाखान्यात आणल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले असून जिल्‍हा सामान्य रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालयातील मुख्य वैद्यकीय अधीकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी खबर दिल्यावरुन तालूका पेालिसांत अकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस नाईक ईश्‍वर लोखंडे करीत आहेत.

Protected Content