Home क्राईम विहिरीत पाय घसरल्याने शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू

विहिरीत पाय घसरल्याने शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू


पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील शेवगे प्र.ब. येथील गणेश भिका पाटील या ५२ वर्षीय  शेतकऱ्याच्या विहिरीत पाय घसरून मृत्यू झाला. २ रोजी ही घटना घडली.

याबाबत माहिती अशी की, गणेश भिका पाटील हे २ रोजी पहाटे गाव विहिरीवर गुरांना पाणी पाजत होते. पाणी काढताना त्यांच्या पाय घसरल्याने ते विहिरीत पडले आणि त्यात त्यांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना गावातील पवन पंढरीनाथ पाटील यांनी पाहिली. तेव्हा त्यांनी गावात जाऊन सागर हिंमत पाटील, बापू सीताराम पाटील, रवींद्र सुरेश पाटील, अशोक लालचंद पाटील, शांताराम विठ्ठल पाटील यांना बोलावले व गणेश पाटील यांना विहिरीतून बाहेर काढले.

पारोळा येथे कुटीर रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता डॉ.योगेश साळुंखे यांनी त्यांना तपासून मयत झाल्याचे घोषित केले. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात सागर हिंमत पाटील रा.शेवगे प्र.ब.यांनी खबर दिली. त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल जयवंत पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound