धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पिंपळेसीम शिवारातील विहिरीत एका अनोळखी तरूणाचा पाण्यात तरंगतांना मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आली आहे.याप्रकरणी बुधवार ४ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
धरणगाव तालुक्यातील पिंपळेसीम गावातील रहिवाशी संतोष पाटील यांच्या शेतातील विहिरीत अंदाजे चाळीस वर्षीय अनोळखी तरूणाचा मृतदेह बुधवारी ४ जानेवारी रेाजी सकाळी ११ वाजता आढळून आला आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती संतोष पाटील यांनी धरणगाव पोलीसांना दिली. धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा करून स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने धरणगाव ग्रामीण रूग्णालयात रवाना करण्यात आला. मयत हा तरूण अंदाजे ४० वर्षीय असल्याचा अंदाज शाासकीय वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात बुधवार ४ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक दिपक पाटील हे करीत आहे.