जळगाव प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील कोळंबा येथील 20 वर्षीय तरूणाने विष घेतले होते. जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचार घेत असतांना मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री उशीरा घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीसात अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली.
याबाबत माहिती अशी की, विजय मानसिंग बारेला (वय-20) रा. कोळंबा ता.चोपडा या तरूणाने 18 जानेवारी 2020 रोजी सायंकाळी 6 वाजता शेतात विषारी औषध घेतले होते. नातेवाईकांनी जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. सोमवारी 27 जानेवारी रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घोषणा वैद्यकिय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे यांनी केली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.