विषारी औषध घेतल्याने कजगाव येथील शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

भडगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।तालुक्यातील कजगाव येथील 50 वर्षीय शेतकऱ्याने विषारी औषध घेतल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत शुक्रवार 24 मार्च रोजी भडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नरेंद्र भिकन पाटील (वय 50 रा. कजगाव तालुका भडगाव) असे मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

 

 

भडगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नरेंद्र भिकन पाटील हे आपल्या परिवारासह कजगाव येथे वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. गुरुवार 23 मार्च रोजी त्यांनी शेतात असताना विषारी औषध घेतले त्यांना अत्यवस्थ वाटत असल्याने त्यांना तातडीने चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान शुक्रवार 24 मार्च रोजी दुपारी 2 वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विषारी औषध घेण्याचे कारण समजू शकत नाही. या संदर्भात भडगाव पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक नरेंद्र विसपुते करीत आहे.

Protected Content