जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विषारी औषध घेतलेल्या जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ज्ञानेश्वर सोपान पाटील (वय-३९) रा. कुसुंबा ता. जि.जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ज्ञानेश्वर पाटील याने राहत्या घरी १३ सप्टेंबर रोजी विषारी औषध घेतले. त्याला अत्यवस्थ वाटत असल्याने तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. शनिवारी १७ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यावेळी जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली होती. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक साईनाथ मुंडे करीत आहे.