पारोळा प्रतिनिधी । विश्ववेध राज्य पत्रकार संघटनेच्या बैठकीत जिल्हा उपाध्यक्षपदी देविदास चौधरी यांची निवड करण्यात आली.
विश्ववेध राज्य पत्रकार संघटनेची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पारोळा तालुक्यातील येथील पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत, राज्याध्यक्ष शैलेश पाटील यांच्या हस्ते जिल्हा उपाध्यक्षपदी देविदास चौधरी, संघटकपदी राकेश जावरे ,पारोळा तालुका- कार्याध्यक्षपदी योगेश महाले. पारोळा तालुका संघटक- रविंद्र निकम यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी राज्य कार्याध्यक्ष अशोराज तायडे राज्य सचिव राजेंद्र शर्मा, राज्य उपाध्यक्ष जगदिश गाढे, राज्य सल्लागार युवराज वाघ, जळगाव जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी सोहेल मणियार यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.