विविध मागण्यासाठी आयटीआय विद्यार्थांचा प्रांत कार्यालयावर धडकला मोर्चा!

सावदा,ता. रावेर,प्रतिनिधी| येथून जवळ असलेल्या मस्कावद येथील  आयटीआय विद्यार्थी व कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्या त्वरित पूर्ण कराव्या यासाठी देशव्यापी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून यासंदर्भात निवेदन देण्यात आले.

 

कोरोनाच्या नावाखाली आयटीआय विद्यार्थांचे विविध मागण्यासह परीक्षा पुढे धकलल्याने विद्यार्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे विविध मागण्यासह परीक्षा तातडीने घेण्यात यावे म्हणून विद्यार्थी व कर्मच्यार्यांकडून मथुरा ते दिल्ली पदयात्रा काढून २ नोव्हेंबर रोजी जंतर मंतर येथे मोर्चा करण्यात येणार आहे. दरम्यान दिल्ली येथील प्रांतअधिकारी कैलास कडलग यांना मोर्चे बाबत  निवेदन देण्यात आले आहे. याच पास्वभूमीवर तालुक्यातील मस्कावद येथील आयटीआयच्या विद्यार्थी व कर्मचारी यांनी फैजपूर येथील सुभाष चौक पासुन प्रांत कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढून निवेदन दिले. निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष पी. ई.  पाटील, टि .के. धांडे, एम एस चौधरी, आयटीआय चे निर्देशक पराग बेंडाळे. भूषण धांडे, बऱ्हाटे, राजू इंगळे, सरजू होले, संदीप चौधरी तसेच मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्तीत होते.

 

Protected Content