विविध मागण्यांसाठी पिपल्स रिपब्लीकन पार्टीचा पंचायत समितीवर मोर्चा (व्हिडिओ)

यावल,  प्रतिनिधी । येथील पंचायत समितीवर पिआरपीसह एकुण दहा संघटनांच्या माध्यमातून आज  विविध प्रलंबीत मागण्या व मराठा, मुस्लीम, धनगर आरक्षणासाठी  आंदोलन करण्यात आले. 

 

आज  पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने पक्षाचे जिल्हा अध्यक्ष जगनभाई सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली यावल बसस्थानक परिसरापासुन मोर्चा काढण्यात आला. मोर्चात एकुण १o संघटनांनी आपला सहभाग नोंदविला.  यावेळी पिपल्स रिपब्लीकन पार्टीच्या वतीने मोर्चा व आंदोलनाच्या माध्यमातुन यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. निलेश एस. पाटील यांना निवेदन देण्यात आले.  मागण्या मान्य न झाल्यास ठिय्या  आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. या निवेदनात म्हटले आहे की , किनगाव खुर्द तालुका यावल येथील ग्राम पंचायतच्या माध्यमातुन लाखो रुपयांच्या निधीतुन दलीत वस्ती सुधार योजनेअंतर्गत होत असलेल्या कामांची  तात्काळ चौकशी करण्यात यावी.  यासंदर्भातील निवेदन देवुन देखील पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने चौकशी कामी होत असलेली दिरंगाई व दुर्लक्ष संशय निर्माण करणारे असल्याची संतप्त प्रतिक्रीया या वेळी जगनभाई सोनवणे यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे गावातील एकाच गटारीचे बांधकाम वारंवार करण्यात येत असून यात दलीत वस्तीमधील विकासाची कामे ही इतर प्रभागात वढविली जावुन ती करण्यात येत आहे.  सदरचे काम हे अत्यंत निकृष्ठ प्रतीचे झालेले असून  पिपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तक्रार करून देखील संबधीत अधिकारी हे संगनमताने गुणवत्ता नसलेल्या कामांचे बिले आर्थिक मोहाला बळी पडुन काढुन घेत असल्याच्या तक्रारी पक्षाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. तालुक्यातील मनवेल ग्रामपंचायतच्या माध्यमातुन रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजुर झालेल्या विधवा निराधार दलित महीलेस ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांच्या आडमुठ्या  धोरणामुळे अनुदान मिळत नसल्याने त्या निराधार महीलेची भटंकती होत  असून तिला तात्काळ अनुदान देण्यात यावे. याशिवाय राज्यातील मराठा, मुस्लीम , धनगर समाजाला आरक्षणा बत ही यावेळी निवेदन देण्यात आलीत, आज यावल पंचायत समितीवर काढण्यात आलेल्या मोर्चा आंदोलनात पिपल्स रिपब्लीकन पार्टीचे जिल्हा अध्यक्ष जगनभाई सोनवणे व तालुका अध्यक्ष राहुल साळुंखे , उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राकेश बग्गन , अल्पसंख्यांक विभागाचे तालुका अध्यक्ष आरीफ शेख , गोपी साळी, पिआरपीचे जिल्हा उपाध्यक्ष रतन वानखेडे, संविधान आर्मीचे निलेश सेंदाणे, मातंग सेनेचे विजय सुधाकर तायडे आदी पदाधिकारी यांनी या आंदोलनात भाग घेतला . यावेळी पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/809905826349739

 

Protected Content