जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यात विविध विभागांचे मंत्री तसेच केंद्रीय मंत्री यांचा संभाव्य दौरा असून संबंधित संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार दि. १८ ते २० मार्च दरम्यान नियुक्त संपर्क अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये, असे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान, गोव्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री ना. नितिन गडकरी, ना.पियुष गोयल, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे, राज्यमंत्री विश्वजित कदम आदी मंत्र्यांचा दि. 19 आणि 20 मार्च दरम्यान संभाव्य दौरा असून यासाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यात अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन. जळगाव उपविभागीय अधिकारी महेश सूधाळकर, न्हाई चे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अरुण कुमार, जिल्हा वित्त अधिकारी राजेंद्र खैरनार, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी, सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवाई, जिल्हा कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर यांची संबंधित मंत्री, केंद्रीय मंत्र्यांचे संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे, संबंधित अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये असे निर्देश जिल्हाधिकारी राऊत यांनी दिले आहेत.