Home क्राईम विवाहितेला पैशांसाठी छळ

विवाहितेला पैशांसाठी छळ


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगर येथे राहणाऱ्या विवाहितेला पैशांची मागणी करून शिवीगाळ करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात शुक्रवारी १६ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगरात कोमल पंकज सूर्यवंशी या महिला पती पंकज साहेबराव सूर्यवंशी यांच्यासह वास्तव्याला आहे. लग्न झाल्यानंतर गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून विवाहितेला पैशांची मागणी सुरू झाली. दरम्यान विवाहितेने पैसे आणले नाही, म्हणून तिला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच जीवेठार मारण्याची धमकी देखील दिली. हा प्रकार सहन न झाल्याने महिलेने रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शुक्रवार १६ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता पंकज साहेबराव सूर्यवंशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुनील पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound