ब्रेकींग : दुध संघ चेअरमनपदी आ. मंगेश चव्हाण बिनविरोध !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हा दुध संघाच्या चेअरमनपदासाठी आमदार मंगेश चव्हाण यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याचे त्यांची बिनविरोध निवड निश्‍चीत झाली आहे.

नुकत्याच पार पाडलेल्या जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय झाला होता. यात प्रामुख्याने चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची महत्वाची भूमिका राहिली होती. यामुळे ते चेअरमनपदी विराजमान होतील असे मानले जात होते. या अनुषंगाने काल रात्री झालेल्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

दरम्यान, आज सकाळी जिल्हा दुध संघ चेअरमनपदाची निवड प्रक्रिया सुरू झाली. यात शेतकरी विकास पॅनलतर्फे आमदार मंगेश चव्हाण यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. यामुळे त्यांनी या पदावर बिनविरोध निवड निश्‍चीत झाली असून याबाबत लवकर अधिकृत घोषणा होणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content

%d bloggers like this: