Home क्राईम विवाहितेच्या छेडखानीतून तरूणाचा खून

विवाहितेच्या छेडखानीतून तरूणाचा खून

0
77

जळगाव प्रतिनिधी । आपल्या बहिणीची छेड काढणार्‍याला एका तरूणाने केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यतील कानळदा-फुफनगरी रस्त्यावर घडली.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, नशिराबाद येथील रहिवासी अमजद खान खलिल खान (वय २८) हा तरुण व त्याचा मित्र अफसर अली मन्सूर अली असे दोघेही दुचाकीने कानळदा येथे ट्रीपचे पैसे घेण्यासाठी आले होते. मात्र, ज्याच्याकडे पैसे घ्यायचे होते, तो घरी नसल्याने परतीच्या वेळी फुफनगरी गावाकडून निघाले. त्याठिकाणी अमजदने एका महिलेची छेड काढल्याचा राग आल्याने विवाहितेच्या भावाने अमजदला मारहाण करणे सुरू केले. या मारहाणीतच अमजदचा मृत्यू झाला. या प्रकरणी रामचंद्र कडू मरसाळे (वय-२४) याच्याविरोधात तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यास अटक केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound