Home क्राईम विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

0
81

भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावात राहणारी ३० वर्षीय महिलेचा मोबाईलमध्ये फोटो काढून विनयभंग केला आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील (वय-३०) गृहिणी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ३० एप्रिल रोजी रात्री ९ ते १ मे रात्री ९ वाजेच्या दरम्यान गावातील चेतन गणेश तायडे याने घरासमोर येऊन महिलेकडे एकटक पाहत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी विवाहितेने वरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन संशयित आरोपी चेतन तायडे याच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल मुकेश जाधव करीत आहे.

 

 


Protected Content

Play sound