जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील पोलीस लाईन येथे माहेर असलेल्या विवाहितेला माहेरहून १ लाख रुपये आणावे, या मागणीसाठी छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळी विरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील पोलीस लाईन येथे वास्तव्यात असलेल्या जयश्री विलास म्हसरूप (वय-२६) यांचा विवाह औरंगाबाद जिल्ह्यातील पळसवाडी येथील विलास देविदास म्हसरूप यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. दरम्यान लग्नानंतर पती विलास म्हसरूप यांनी विवाहितेला माहेर होऊन १ लाख रुपये आणावे, अशी मागणी केली. विवाहितेने पैसे आणले नाही म्हणून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. या प्रकरणात सासरच्या मंडळींनी पैशांचा तगादा लावला. या छळाला कंटाळून विवाहिता जळगावी निघून आल्या. गुरुवार १५ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून पती विलास देविदास म्हसरूप, सासू काशीबाई देविदास म्हसरूप, सासरे देविदास गजानन म्हसरूप, जेठ कैलास देविदास म्हसरूप, जेठाणी छाया कैलास म्हसरूप, दीर अमोल देविदास म्हसरूप सर्व रा. पळसवाडी ता. खुलताबाद जि. औरंगाबाद, ननंद रंजना अमोल शेळके आणि नंदोईभाऊ अमोल शेळके दोघे रा.हातनूर ता.कन्नड जि.औरंगाबाद यांच्या विरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संदीप पाटील करीत आहे.