मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आगामी निवडणुकांच्या आधी देशात भाजप विरोधकांच्या एकत्रीकरणाची सुरूवात झाली असल्याचे प्रतिपादन आज खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
आज पत्रकारांशी बोलतांना संजय राऊत म्हणाले की, २०२४ च्या दृष्टीने देशातील प्रादेशिक किंवा राष्ट्रीय पातळीवरील विरोधी पक्ष एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही अत्यंत आशादायी गोष्ट आहे. कॉंग्रेसच्या नेतृत्वात नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांची एक बैठक झालीय. नितीश आणि तेजस्वी राहुल गांधींना आणि मल्लिकार्जून खर्गेंना भेटले. गुरुवारी शरद पवार, राहुल गांधी आणि खर्गे भेटले. त्याआधी मुंबईत उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट झाली.
खासदार राऊत पुढे म्हणाले की, या देशातील सर्व प्रमुख विरोधी पक्षनेत्यांना भेटून ते एकत्र येण्यासाठी काम करत आहेत. त्यात आम्हीही सहभागी आहोत. महाराष्ट्रात आम्ही लोकसभेच्या ४८ पैकी ४० जागा जिंकू, असं वातावरण आहे, असं दावा संजय राऊतांनी केला.