यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील विरावली गावात येथे जनमत प्रतिष्ठानच्या माध्यमातुन ग्रामीण क्षेत्रातील तरूणामध्ये वाचन संस्कृती निर्माण व्हावी या दृष्टीकोणातुन स्वर्गीय किसन पुना नाले स्मरणार्थ एक गाव एक वाचनालयाची सुरुवात आज बिएसएफ दिना निमित्ताने करण्यात आली.
जनमत प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेच्या वतीने प्रत्येक ग्रामीण क्षेत्रातील गावांमध्ये ‘एक गाव एक वाचनालय’ या वाचन संस्कृतीला दिशा देणारे उपक्रमाची सुरवात यावल तालुक्यातील विरावली या गावापासून १ डिसेंबर २०२२ पासुन सीमा सुरक्षा बलचे स्थापना दिवसचे विरवली येथील सैनिक महेंद्र पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, अर्ध सैनिक कल्याण समिति यावल, जागर प्रतिष्ठानचे नाना पाटील, सुरेंद्र पाटील, तालुकाध्यक्ष राजेश जगताप, सरपंच कलीमा तडवी, माजी सरपंच ईश्वर पाटील आणि नागरिकांसह विद्यार्थीनी व विद्यार्थी आदी उपस्थित होते. याप्रसंगी पर्यावरण निसर्गाचे नाना पाटील यांनी कृउबा माजी सभापती तुषार पाटील, सरपंच कलीमा तडवी, सैनिक महेन्द्र पाटील यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्याचप्रमाणे उपस्थित विद्यार्थ्यांना पौष्टीक आहार व चॉकलेट ही मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आलीत.
या उपस्थित मान्यवरांनी गावकऱ्यांना संबोधित करतांना सांगीतले की, या वाचनालयाच्या माध्यमातुन आपल्या गावातील प्रत्येक नागरीकापर्यंत शहरातील, महाराष्ट्रातील, देशातील व आपल्या परिसरातल्या आणी देशातील घडामोडी ग्रामीण भागापर्यंत पोहोचू शकतील अशी अपेक्षा यावेळी बोलतांना सांगीतले. यावेळी गावातील सैनिक महेन्द्र पाटील यांच्या प्रयत्नातुन सुरू झालेल्या या वाचनालय या उपक्रमाचे ग्रामस्थांच्या वतीने सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे .