विरावली निवडणुकीत पुनश्च ग्रामपंचायतीवर भगवा फडकला

 

यावल प्रतिनिधी ।तालुक्यातील राजकीयदृष्टया नेहमीच चर्चेत असणाऱ्या विरावली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख आणि यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार उर्फ मुन्ना सांडुसिंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनाप्रणीत पॅनलने पुनश्च या ग्रामपंचायतीवर भगवा फडकविला असून राज्यातील सत्तेत सोबत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चार जागांवर विजय मिळवला आहे.

यावल तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रीक पंचवार्षिक निवडणुकीचे निकाल सोमवारी मतमोजणीनंतर जाहीर झाले आहे. तालुक्यात राजकीय दृष्टीकोणातुन नेहमीच चर्चेत राहणाऱ्या विरावली ग्रामपंचायतीवर शिवसेनेने आपला भगवा कायम राखला असून शिवसेनेचे एकनिष्ठ व राजकीय पटलावर आपली वेगळी प्रतिमा प्रस्थापित करणारे शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तुषार उर्फ मुन्ना पाटील आणि युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अॅड. देवकांत पाटील यांच्या पॅनलमध्ये सरळ झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने ५ जागांवर आपले उमेदवार विजयी करण्यात यश मिळवले असुन राष्ट्रवादीने ४ जागांवर विजय मिळवला आहे.

विजयी झालेले उमेदवारांची मते : तुषार सांडुसिंग पाटील (१८२) ,कमिला फिरोज तडवी (१४३) ,ईब्राहीम दलशेर तडवी (१८५) , नथ्थु नामदेव अडकमोल (१४२), मनिषा विश्वनाथ पाटील (१९५), शकुंनतलाबाई विजयसिंग (१६६) , देवकांत बाजीराव पाटील ( ३२०) , हमीदा टेनु तडवी (३०४) , शोभाबाई युवराज पाटील (२९३).

Protected Content