बीजिंग : वृत्तसंस्था । आता चीनने विमानापेक्षाही वेगावन ट्रेन सुरु केली आहे जगात सर्वात वेगाने धावणारी कमर्शियल ट्रेन शंघाय ही मगलेव ट्रेनही आता चीनच्या वेगवान ट्रेन नेटवर्कमध्ये सहभागी झालीय.
चीनमध्ये जगाच्या तुलनेत वेगवान ट्रेन्सचं जाळं अधिक घट्ट आहे. चीनमधील वेगवान रेल्वेचं जाळं हे जवळजवळ ३७ हजार किलोमीटर लांबीचं आहे.
चीनने हाय स्पील मगलेव ट्रेनचा प्रोटोटाइप याच वर्षी जानेवारीमध्ये सादर केल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांमध्ये त्यांनी हा प्रकल्प पूर्ण केलाय. या ट्रेनची पहिली झलक नुकतीच चीनने जगाला दाखवली. ही मगलेव ट्रेन तासाला ६०० किमी अंतर पार करु शकते. म्हणजे ही ट्रेन बिजिंग वरुन शंघायला विमानापेक्षाही अधिक वेगाने पोहचते.
चीनने या ट्रेनचं २१ मीटर लांबीचं प्रोटोटाइप जानेवारी महिन्यामध्ये चेंगडू येथे सादर केलं होतं. यूनिव्हर्सिटी रिसर्चर्सने एक १६५ मीटर लांबीचा ट्रॅक बनवून त्यावर या ट्रेनच्या प्रोटोटाइपचं प्रात्यक्षिक दाखवलं होतं. ट्रेनचा लूक आणि ट्रेनमध्ये बसल्यावर कसा अनुभव असेल हे दाखवणारी प्रोटोटाइप ट्रेन तयार करण्यात आली होती. त्यानंतर सहा महिन्यांमध्ये ही ट्रेन प्रत्यक्षात धावण्यास सज्ज झालीय. प्रोटोटाइपवर काम करणारे प्राध्यापक चुआन यांनी दिलेल्या माहितीनुसार या ट्रेनचं संपूर्ण जाळं तीन ते १० वर्षांच्या कालावधीमध्ये कार्यरत होईल असं म्हटलं होतं. त्यांनी सिचुआनमध्ये काही दुर्मिळ साधनसंपत्ती आहे जीचा वापर या ट्रेनच्या तंत्रज्ञानामध्ये स्थायी स्वरुपाचे चुंबकीय ट्रॅक निर्माण करता येऊ शकतो अशी शक्यताही व्यक्त केली.
चीनने बनवलेली ही मगलेव ट्रेन हाय टेम्परेचर सुपरकंडक्टिंग पॉवरवर चालते. ही ट्रेन चुंबकीय ट्रॅक्सवर तरंगत प्रवास करत असल्यासारखा भास होतो. त्यामुळे या ट्रेनला फ्लोटिंग ट्रेन असंही म्हटलं जातं. मगवेल ट्रेन ही चीनसारख्या मोठ्या आकाराच्या देशामध्ये हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी विमान प्रवासाला एक चांगला पर्याय ठरु शकते. चीनमध्ये विमानांचा जास्तीत जास्त वेग हा ९०० किमी प्रती तास इतका आहे.
वेगवान ट्रेन्सचे ट्रॅक आणि मूलभूत सेवा उभारण्यामागे चीनने १५०० किमी लांबीचे अंतर लवकरात लवकर कापता यावे या उद्देशाने पर्यायी सेवा निर्माण करण्याचं काम हाती घेतलं आहे. बीजिंग शंघायदरम्यानचे १२०० किमीचे अंतर कमी वेळेत कापण्याच्या हेतूने चीन आता काम करत आहे. सध्या विमानाने हा प्रवास कऱण्यासाठी साडेचार तासांचा वेळ लागतो तर सध्याच्या ट्रेनने हा वेळ पाच तासांचा आहे. मात्र मगलेव ट्रेन्समुळे हे अंतर अवघ्या साडेतीन तासांमध्ये कापता येईल.
चीन ज्या पद्धतीने सार्वजनिक वाहतूक सेवा निर्माण करत आहे त्या सेवांचा फायदा औद्योगिकरणासाठी करुन घेण्याचा विचार करत आहे. मात्र यापूर्वी वेगवेगळ्या पद्धतीच्या चाचण्या करणं आवश्यक असून यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागू शकतो असं तज्ज्ञ मंडळी सांगतात. चाचण्या केल्यानंतरच या ट्रेन्सचा व्यवसायिक वापर करता येऊ शकतो. चीनला २०२५ पर्यंत ५०० किमी प्रती तास वेगाने चालणाऱ्या ट्रन्सचा व्यवसायिक दृष्टीकोनातून वापर करायचा आहे.
चीनमध्ये ६०० किमी प्रती तास वेगाने धावणाऱ्या हाय स्पीड मगलेव ट्रान्सपोर्ट सिस्टीमचा वापर २०१६ पासून सुरु करण्यात आला. हा प्रकल्प चीनच्या विज्ञान आणि प्रद्यौगिक मंत्रालयाच्या अत्याधुनिक रेल्वे प्रकल्पांअंतर्गत राबवण्यात आला. वेग, सुरक्षा, विश्वासार्हता, जास्त प्रवासी क्षमता, वक्तशीरपणा, पर्यावरणपूरक, कमी देखरेखीचा खर्च ही सगळी हाय स्पीड मगलेव ट्रेन्सची वैशिष्ट्ये आहेत.
चीनमधील सर्वात वेगवान ट्रेन असणाऱ्या मगलेव प्रकारच्या ट्रेन्स २००३ पासून चालवल्या जात आहेत. या ट्रेनचा सर्वाधिक वेग हा ४३१ किमी प्रती तास इतका आहे. ही ट्रेन शांघायमधील पुडोन्ग विमानतळाला शंघायच्या पूर्वेकडील लॉन्गयाग रोडशी जोडते. चीनमध्ये २०२२ पर्यंत जास्तीत जास्त मूलभूत सेवा निर्माण करण्याचं उद्दीष्ट समोर ठेवलं आहे. हिवाळी ऑलिम्पिकचे बीजिंगमध्ये आयोजन करण्यात आलं असल्याने मुख्य शहराला जोडण्यासाठी मूलभूत सेवा उभारण्यासाठी चीन वेगाने काम करत आहे.
जानेवारी महिन्यामध्ये चीनमध्ये विशेष बुलेट ट्रेन सेवा सुरु करण्यात आली. या ट्रेन कमी तापमान असणाऱ्या प्रदेशातही योग्य पद्धतीने चालू शकतात. सीआर ४०० एएफ-जी नावाच्या या ट्रेन ३५० किमी प्रती तास वेगाने उणे ४० डिग्री तापमानामध्येही चालू शकते.