केंद्रीय गृहमंत्र्यांना खोटे पडणारे, आज स्वतः उघडे पडलेत- भातखळकर

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडला उद्धव ठाकरेंकडून हि अपेक्षा नव्हती, अशी नाराजी छत्रपती संभाजीराजेंनी व्यक्त केली. यावर छत्रपतींच्या निमित्ताने चार भिंतीच्या आत कोण खोटे बोलतो हे उघड झाले,  केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना खोटे पडणारे आज स्वतः उघडे पडलेत अशी टीका भाजपचे अतुल भातखळकर यांनी ट्वीटद्वारे केली आहे.

शिवसेनेने तुम्ही शिवसेनेत प्रवेश करा, आम्ही लगेच तुमचे नाव राज्यसभेचे उमेदवार म्हणून जाहीर करू असे मुख्यमंत्र्यांनी भेटीदरम्यान सांगितले. मला कोणत्याही बंधनात अडकायचे नाही, किंवा शिवसेनेचा द्वेष नाही. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द मोडला. तसेच माझ्यासाठी जनता महत्वाची असून खासदारकी महत्वाची नाही. हि माघार नसून माझा स्वाभिमान असल्याचे छत्रपतींनी म्हटले आहे. यानिमित्ताने बंद दाराआड अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचे वचन दिले होते, असे म्हणत केंद्रीय मंत्री अमित शहांना खोटे पडणारेच आज छत्रपतींच्या निमित्ताने पुरते उघड पडले असल्याची टीका भाजपचे अतुल भातखळकर यांनी केली आहे

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!