यावल प्रतिनिधी । तालुक्यातील दहिगाव येथील कृषी केंद्र राज्य संचालकांच्या वतीने माफदा पुणे च्या जळगाव जिल्हा अध्यक्षपदी विनोद तराळ यांची निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी उपाध्यक्ष कैलास मालू, राजू पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी एम. ए. चौधरी तर प्रमुख पाहुणे म्हणून विजय कुमार जैन, किरण नेते, अशोक जैन, राजू जैन, ललित लोढा, दिलीप पौडवाल, कन्हैया शेठ, प्रशांत पाटील,लक्ष्मण शास्त्री ,नितीन कुलकर्णी, कोंडे यांच्यासह तालुक्यातील सर्व कृषी केंद्रांचे संचालक तसेच जळगाव चे व्यापार्यांसह आदी मान्यवर या सत्कार सोहळ्यास प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी व्यवसायात च्या माध्यमातून प्रत्येकाने व्यवसायाशी एकरूप राहावे व युनिटीने राहावे हे असे आवाहन चौधरी यांनी केले तर विजयकुमार जैन यांनी व्यवसायाबाबत मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे जिल्हा व तालुकास्तरावर असोसिएशन संघटनेची संघटना मजबूत करण्यासाठी जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करावी मी माझ्यावर सभासदांनी केलेल्या प्रेमाबाबत त्यांच्या प्रेमाला आणी त्यांनी दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही व विश्वासाला सार्थ करण्याचे काम करेल अशी ग्वाही विनोद तराळ यांनी दिली.
यावेळी सुभाष अग्रवाल यांची ही उपस्थिती होती. समारंभासाठी तालुका अध्यक्ष प्रशांत पाटील उपाध्यक्ष मनोज वायकोळे अशोक जैन, कुंदन महाजन, वसंत गजमल पाटील ,समाधान पाटील . रमेश पाटील ,श्रीकांत पाटील ,नितीन पाटील, रवींद्र महाजन, गजानन महाजन आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक समाधान पाटील सर सूत्रसंचालन कोंडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रशांत पाटील यांनी मानले.