जळगाव प्रतिनिधी । शहरातील नामवंत हॉस्पिटलमध्ये परीचारीका म्हणून काम करणाऱ्या मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी तिन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला हाता. यातील तिघांना पे बॉन्डवर न्यायालयाने सुटका करण्यात आली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील रहिवासी 25 वर्षीय पारिचारिकेचा रुग्णालयातच काम दोघा वार्डबॉयसह रिसेप्शनिष्ट अशा तिघा तरुणांनी छळ करत टिकटॉकवर अश्लिल शेरेबाजीचा व्हिडीओ बनविल्याची घटना रविवारी समोर आली होती याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात विनयभंगांसह आयटीअॅक्टप्रमाणे तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मध्यरात्रीच जिल्हापेठ पोलिसांनी गौरव प्रकाश सुरडकर वय 19, प्रतिक प्रमोद पाटील आणि आतिष पिरखाँ तडवी वय 19 तिघे रा. श्रीकृष्ण पोलीस कॉलनी, निमखेडी शिवार या तिघा संशयित तरुणांना अटक केली आहे. तिघांनी वेगवेगळ्या कारणावरुन तरुणीचा छळ केला. तसेच तरुणीच्या नावाचा उल्लेख करुन तरुणीच्या मनाज ल्लजा उत्पन्न होईल असा, अश्लिल शेरेबाजीचा व्हिडीओ बनवून व्हायरल केला. याप्रकरणी रुग्णालयातील व्यवस्थापकांसह डॉक्टरांकडे तक्रार केल्यानंतर तरुणीने याप्रकरणी रविवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यावरुन तिघा तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरिक्षक अकबर पटेल यांनी तातडीने या गंभीर घटनेची दखल घेत, गुन्हे शोध विभागातील पथकाला सुचना केल्या. त्यानुसार कर्मचार्यांनी रात्री 11.17 वाजेच्या सुमारास गौरव सुरडकर, आमिर तडवी, प्रदीप पाटील या तिघांना अटक केली. न्यायालयात हजर केले असता, तिघांची पे बॉन्डवर सुटका करण्यात आली.