विधी सेवा समिती व वकील संघाकडून कायदेविषयक शिबिराचे आयोजन !

चाळीसगाव, प्रतिनिधी । तालुका विधी सेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील चैतन्य तांडा ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर कायदेविषयक चर्चा शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.

 

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या निर्देशनाप्रमाणे पॅन इंडीया अवेरनेस आणि आउटरीच प्रोग्राम अंतर्गत तालुका विधी सेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने चैतन्य तांडा येथे कायदेविषयक चर्चा शिबिराचे आयोजन शुक्रवार, १७ सप्टेंबर रोजी येथील ग्रामपंचायती समोर करण्यात आले. त्याचबरोबर करगांव तांडा येथेही कायदेविषयक चर्चा शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर शिबिरात खालील विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी ए.एच. शेख (दुसरे सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर चाळीसगाव) यांनी ए.डी.आर प्रोसेस या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. ॲड. सुलभा शेळके (सह सचिव वकीलसंघ,चाळीसगाव) यांनी वरिष्ठ नागरिकांचे अधिकार या विषयावर मार्गदर्शन केले. ॲड. संदिप जाधव (सदस्य वकीलसंघ, चाळीसगाव) यांनी कोरोना लसिकरण या विषयावर मार्गदर्शन केले. ॲड. समाधान राठोड, (सदस्य वकीलसंघ, चाळीसगाव) यांनी कौटुंबिक हिंसाचार कायदा या विषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर जी.व्ही. गांधे, (सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर तथा प्रभारी अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती,  चाळीसगाव) यांनी अध्यक्षीय भाषण करून वरील सर्व विषयांबाबत माहिती दिली. ॲड. पी.एस. एरंडे (अध्यक्ष वकील संघ चाळीसगाव) यांनी आभार प्रदर्शन केले. तर सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चैतन्य तांडा क्र. ४ चे सरपंच अनिता दिनकर राठोड, माजी चेअरमन दिनकर राठोड, उपसरपंच आनंद राठोड, सदस्य संदीप पवार, वसंत राठोड, सामाजिक कार्यकर्ता अशोक राठोड आदींनी परिश्रम घेतले. शिबिरात प्रस्तावना व सुत्रसंचालन ॲड. कविता जाधव, (सचिव वकील संघ चाळीसगाव) यांनी केले. त्यानंतर एल.ए.डी. स्क्रीनद्वारे सिग्नल पॉईंट चाळीसगाव, पातोंडा, ओझर, टाकळी प्र.चा., खरजई या गावांमध्ये अॅड. भारत राठोड यांच्या मार्फत कायदेविषयक माहिती देण्यात आली. सदरील शिबीरानंतर कायदेविषयक जनजागृती व लोकअदालती बाबतची पत्रके पंचायत समिती आवार, शहर पोलीस स्टेशन, सिग्नल पॉईंट, तहसिल कार्यालयासमोर, बसस्टॅंड मध्ये वाटण्यात आली. त्याबाबतची माहिती अॅड. एम.पी.वाघ सदस्य सचिव चाळीसगाव वकील संघ, अॅड.  डि. एस. दाभाडे, अॅड.  संदिप सोनवणे, सदस्य चाळीसगाव वकील संघ,  जितेंद्र नेवे पी.एल.व्ही., सी. के. बोरसे, सहा. अधिक्षक, अमित गेडाम, शिपाई दिवाणी न्यायालय चाळीसगाव यांनी कार्यक्रम यशस्वी केला. तसेच प्रोजेक्टर स्क्रीनद्वारे चाळीसगाव न्यायालय आवारात लिगल अवेरनेस बाबत उपस्थित प्रेक्षकांना माहिती दाखविण्यात आली. सदर शिबिराचे नियोजन व व्यवस्थापन डी.के.पवार, लिपीक, महेंद्र साळुंखे, क.लिपीक, योगेश जे. चाैधरी क.लिपीक, डी.टी.कु-हाडे व क. लिपीक यांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.

Protected Content