रावेर प्रतिनिधी । विधीमंडळ अंदाज समिती जळगाव जिल्ह्यात तीन दिवसाच्या दौऱ्यावर आहे. आज रावेर शहरात समिती येण्याची शक्यता असून तालुका प्रशासनाच्यावतीने मराठा मंगल कार्यालयात तयारी करण्यात आली आहे.
काल मंगळवार २४ ऑगस्ट रोजी विधीमंडळ समिती जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहे. पहिल्याच दिवशी समितीचे जळगाव शहरात विविध विभागात जावून माहिती व आढावा घेतला. जिल्ह्यात विधीमंडळ अंदाज समिती आली विविध विभागाच्या योजनाची समितीत आलेले सदस्य आढावा घेणार आहे. सर्वसाधारण जनतेपर्यंत शासनाच्या योजनांची आढावा, कोरोना काळात किती खर्च केला याचा आढावा घेण्याची शक्यता आहे. यासाठी रावेर तालुका प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. स्टेशन रोडवर असलेल्या मराठा मंगल कार्यालयच आढावा घेण्यात येणार आहे.