बोदवडातून गुरांची चोरी; अज्ञातांवर पोलीसात गुन्हा दाखल

बोदवड प्रतिनिधी । बोदवड शहरातून दोन गायी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, बोदवड शहरातील रेणूका नगरात राहणारे सुभाष सिताराम देवकर (वय-५२) हे शेतकरी आहे. शेती व गुरांचे पालन करून उदरनिर्वाह करतात. २४ ऑगस्ट रोजी त्यांच्या मालकीच्या गुरांच्या गोठ्यातून २० हजार रूपये किंमतीची गाय अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे सकाळी ४.३० वाजता उघडकीला आले. गावात गायीचा शोध घेत असतांना त्यांच्या गावातील संजय पांडूरंग पाटील यांची देखील २० हजार रूपये किंमतीची गाय चोरीस गेल्याचे समजले, बोदवड परिसरात गुरांच्या चोरीचे प्रमाण अधिक प्रमाणावर होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यातच आता दोन गायींची चोरी झाल्याचे उघडकीला आले आहे. सुभाष देवकर आणि संजय पाटील यांनी गायी चोरीची तक्रार बोदवड पोलीसात देण्यात आली आहे. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर मंगळवारी २४ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अयुब तडवी करीत आहे. 

Protected Content