विधवांचे व ज्येष्ठ नागरिकांचे बंद झालेले अनुदान पुन्हा सुरू करण्याची मागणी

 

भुसावळ , प्रतिनिधी । शहरातील अनेक गरजू विधवा महिलांचे संजय गांधी योजनेचे अनुदान तहसीलदार कार्यालया मार्फत बंद केलेले आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. हे अनुदान पुन्हा सुरु करावे अशी मागणी करण्यात येत आहे.

मागील वर्षांपासून मुलगा २५ वर्षाचा झाल्याचे कारण सांगून भुसावळ शहरातील अनेक महिलांचे संजय गांधीचे अनुदान बंद केलेले आहे. परंतु, मुलगा २५ वर्षाचा झाला म्हणून विधवेला संजय गांधी योजनेचा लाभ मिळणार नसेल तर तो त्या महीलेवर अन्यायच असेल.  कारण मुलगा २५ वर्षाचा झाला म्हणजे तो कमवता झाला असे होत नाही. ह्या वयामध्ये मुलांना शिक्षणासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागतात. ह्यामुळे महिलांवर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून शासनाने संजय गांधी निराधार विधवा पेंशन योजनेमध्ये मुलगा २५ वर्षाचा झाला म्हणून विधवेला अनुदान बंदचा निर्णय बदलण्यात यावा व विधवा महिलेला मरणोत्तर संजय गांधी योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच श्रावण बाळ योजनेतील ज्येष्ठ नागरिकांचा सुध्दा वयाचे कारण सांगून लाभ बंद करण्यात आलेला आहे. ह्या लाभार्थ्यांचे ६५ वर्षाची वयाची अट कमी करून ती ५८ वर्ष करण्यात यावे. ह्या गरीब गरजू लोकांनाच ६५ वर्षाची अट ठेऊन ह्या नागरिकांवर अन्याय केल्या सारखे आहे म्हणून राज्य शासनाला ही माहिती देऊन गरजू विधवा व ज्येष्ठ नागरिकांना न्याय द्यावा अन्यथा आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे.

Protected Content