जळगाव सचिन गोसावी । अखील भारतीय विद्यार्थी परिषदेचा केंद्रबिंदू हा विद्यार्थी असून त्याच्या हितासाठी आपण अविरतपर्ण कार्यरत राहणार असल्याचे संघटनेचे नवनियुक्त प्रदेश मंत्री सिध्देश्वर लटपटे यांनी केले. लाईव्ह ट्रेंडस न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
सिध्देश लटपटे म्हणाले की, बी.एस्सी.चे शिक्षण घेत असतांना आपण २०१३ पासून अखील भारतीय विद्यार्थी परिषदेशी जुडलो. प्रारंभी गंगाखेड व लातूर शहरांमध्ये काम केले. यात अनेक महत्वांचे प्रश्न हाताळले. यात प्रामुख्याने २०१४ मध्ये अभाविपचा जिल्हा मेळावा यशस्वी करण्यात आला. यानंतर मराठवाठ्याच्या विविध प्रश्नांवर लक्ष केंद्रीत केले. युती सरकारच्या पाळात २०१५ आयटीआय शुल्क वाढीच्या विरोधात प्रखर आंदोलन केले. मात्र सरकारने याकडे लक्ष दिले नाही. यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूर दौर्यावर आले असतांना ताफा अडविला. राज्यभरात हे आंदोलन खूप गाजले. यामुळे शासनाला विद्यार्थ्यांना नऊ कोटी रूपये द्यावे लागले. यासोबत रामानंद तीर्थ विद्यापीठातील विविध प्रश्नांवर आंदोलन केले.
यानंतर सिध्देश लटपटे हे जळगावला आले असून येथेच ते अभाविपच्या माध्यमातून विविध प्रश्नांवर आवाज उठविण्याचे काम करत आहेत. यात त्यांनी विविध आंदोलनांमध्ये अभाविपचे नेतृत्व केले आहे. अलीकडच्या काळात स्वायत्त अभियांत्रीकीत शुल्क कमी करावे अशी मागणी त्यांनी लाऊन धरली आहे.
कोरोनाच्या आपत्तीमुळे गत दहा महिन्यांपासून बंद असणारी कॉलेजेस उघडावीत या मागणीसाठी अखील भारतीय विद्यार्थी परिषदेने २ फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले होते. याचीच दखल घेऊन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी १५ तारखेपासून कॉलेज सुरू करण्याची घोषणा केल्याची माहिती लटपटे यांनी दिली. अभाविपच्या मागणीला यश मिळाल्याने आता उद्या कॉलेज सुरू झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी आमच्यातर्फे विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
खालील व्हिडीओत पहा सिध्देश लटपटे नेमके काय म्हणालेत ते ?
https://www.facebook.com/508992935887325/videos/257130305939453