जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खासगी क्लासचा होमवर्क न केल्याने एका नऊ वर्षाच्या बालकाला शिक्षिकेने अर्धनग्न करून मारहाण करणाऱ्या शिक्षिकेसह क्लासच्या चालकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शनीपेठेतील गुरूनानक नगरातील रहिवाशी योगेश गणेश ढंढोरे (वय-३७) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचा ९ वर्षाच्या मुलाला बळीरामपेठ येथील कोठारी क्लासेस येथे खासगी क्लास लावलेला आहे. या ठिकाणी पल्लवी जितेंद्र इंदाणी रा. मगर पार्क वाघ नगर या शिक्षिका म्हणून नोकरीला आहे. दरम्यान, ढंढोरे यांच्या मुलाने क्लासमध्ये दिलेला अभ्यास केला नाही. म्हणून शिक्षीका पल्लवी इंदाणी यांनी त्याला शर्ट काढून मारहाण केली तर क्लास संपेपर्यंत इतर विद्यार्थ्यांसमोर उभे करून ठेवले होते, अशी लेखी तक्रार पालक योगेश ढंढोरे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली दिली होती. त्यानुसार सुरुवातीला अदाखलपात्र म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पीडित मुलाला बाल न्याय अधीक्षक मंडळाच्या आदेशानुसार अखेर शनिवार 3 सप्टेंबर रोजी दुपारी शिक्षिका पल्लवी इंदाने आणि कोठारी क्लासचे संचालक बिपीन शाह यांच्या विरोधात चार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रवींद्र सोनार करीत आहे.