जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सुनील कुलकर्णी यांची चुकीच्या पध्दतीने नियुक्ती करण्यात आली असून त्यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी केली आहे.
जळगाव जिल्हा युवक कॉंग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेन्द्र मराठे यांनी कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विजय माहेश्वरी यांना निवेदन दिले. यात मागणी करण्यात आली की विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सुनील कुलकर्णी यांना पदाचा गैरवापर करत आचारसंहितेचे उलंघन व स्वतः ची बेकायदेशीर नियुक्ती या कारणांनमुळे त्यांची तात्काळ त्यांच्या पदावरून हकालपट्टी करण्यात यावी..
राजकीय व्यक्तीची विद्यपीठाने नियुक्ती कशी केली.. ?
या निवेदनात देवेंद्र मराठे यांनी नमूद केले आहे की, प्रा. डॉ. सुनील कुलकर्णी यांची नियुक्ती विद्यापीठाने अतिशय बेकायदेशीरपणे केली. प्रा डॉ सुनील कुलकर्णी यांचे फेसबुक पेज जर तपासून बघितले तर सर्वांच्या लक्षात येत की डॉ. सुनील कुलकर्णी हे भाजप प्रेणीत विद्यार्थी संघटनेचे म्हणजेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जळगाव विभाग प्रमुख या पदावरती असताना देखील विद्यापीठाने त्यांना म्हणजेच एका राजकीय पदाधिकार्याला विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण अधिकारी या पदावर नियुक्त केले सर्वप्रथम तर ही नियुक्ती बेकायदेशीर आहे.
विद्यापीठामध्ये कुठल्याही अधिकारी पदावरती नियुक्त असणारी व्यक्ती ही कुठल्याही राजकीय पक्षाशी संलग्नित नको. आणि जर विद्यापीठाला राजकीय पदाधिकारी चालत असतील तर भाजप पक्षाचेच का..? इतर पक्षांचे देखील संघटनांचे पदाधिकारी यांना देखील विद्यापीठाने विविध अधिकारी पदांवरती नियुक्त करावे..व विद्यापीठाला राजकीय विद्यापीठ करा.. विद्यापीठाने केलेली ही नियुक्ती तात्काळ बरखास्त करून प्रा.डॉ.सुनील कुलकर्णी यांची तात्काळ पदावरून हकालपट्टी करण्यात यावी या पद्धतीची मागणी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी केली..
पदाचा गैरवापर करत आचारसंहितेचे केले उल्लंघन..
देवेंद्र मराठे यांनी नमूद केले आहे की, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची आधी सभा निवडणूक कार्यक्रम सुरू झालेला आहे. विद्यापीठांमध्ये आचारसंहिता देखील लागू झालेली आहे. विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा.डॉ. सुनील कुलकर्णी यांनी २८ डिसेंबर रोजी एक परिपत्रक जाहीर केले.
या परिपत्रकामध्ये त्यांनी विद्यार्थी विकास मंडळ नावाची विद्यापीठ स्तरीय समिती गठित केली. या समितीचे अध्यक्ष विद्यापीठाचे कुलगुरू हे असतात व समितीमधील इतर सदस्य हे विद्यापीठांतर्गत येणार्या महाविद्यालयातील प्राध्यापक असतात. परंतु डॉ सुनील कुलकर्णी हे एबीव्हीपी व संघ विचारधारेचे असल्यामुळे त्यांनी या समितीमध्ये आचारसंहितेचे उल्लंघन करताना संघ विचारधारेच्या पॅनलचे निवडणुकीमध्ये उभे असलेले एक उमेदवार चोपडा येथील पंकज महाविद्यालयाचे प्रा संजय पाटील यांची विद्यापीठाच्या इतक्या महत्त्वाच्या या समितीमध्ये सदस्य म्हणून नियुक्ती केली. यावरून डॉ.सुनील कुलकर्णी हे विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी कमी व भाजप प्रणित व संघ विचारधारेचे एका संघटनेचे पदाधिकारी म्हणून जास्त कार्यरत दिसून येत आहे.
मतदारांना आकर्षित करण्याकरता त्यांनी विद्यापीठाच्या या विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळ समितीमध्ये चक्क अधिसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी करीत असलेल्या उमेदवाराला सदस्य म्हणून नियुक्त केले व आचारसंहितेचे उल्लंघन केले त्यामुळे डॉ. सुनील कुलकर्णी यांना पदावरती राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही व विद्यापीठाचे कुलगुरू यांनी सुद्धा त्यांना तात्काळ या पदावरून हटवण्यात यावे या पद्धतीची मागणी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.