जळगाव ,प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या इनोव्हेशन फेसिनिटेशन सेंटर व आयपीआर सेलद्वारा ‘नविन संशोधन आणि पेटंटींग’ या विषयावर एक दिवसीय वेबिनार आयोजित करण्यात आले होते.
या वेबिनारचे प्रभारी प्र-कुलगुरु प्रा.बी.व्ही.पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रीय रासयनिक प्रयोगशाळा पुणेचे डॉ. प्रकाश पी. वडगावर यांनी मार्गदर्शन करतांना सांगीतले की, उत्तम संशोधनासाठी अडचणी शोधणे गरजेचे असते, या अडचणीतून संशोधकाला उत्तर शोधता येते. आपल्याकडे अतिउत्तम प्रयोगशाळांची कमतरता असून सुध्दा अनेक शास्त्रज्ञांनी खुप चांगले काम केले आहे. त्यांचा आदर्श ठेऊन संशोधनाचे काम केले पाहिजे. आजच्या काळात पेटंट करण्याचे भान ठेवणे गरजे असून त्याचा फायदा संशोधकांना होऊ शकतो. यावेळी डॉ.निरंजन येवले यांचे ही मार्गदर्शन झाले. इनोव्हेशन फॅसिलिटेशन सेंटरचे समन्वयक प्रा. भूषण चौधरी यांनी या वेबिनारचे आयोजन केले होते. यात २८० संशोधक सहभाग नोंदविला.