विद्यापीठाच्या २०० कर्मचाऱ्यांचे लसीकरण

जळगाव, प्रतिनिधी  । विद्यापीठातील शिक्षक, शिक्षकेत्तर अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी, दैनिक वेतनिक आणि सुरक्षारक्षक यांच्यासाठी कोविड-१९ च्या पार्श्वभुमीवर लसीकरणाचा पाचवा टप्पा आयोजित करण्यात आला. यात २०० कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. 

 

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व फिरते लसीकरण केंद्र, जिल्हा आरोग्य विभाग,जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर लसीकरण करण्यात आले. याप्रसंगी प्रभारी कुलगुरु प्रा.ई.वायुनंदन, प्रभारी प्र-कुलगुरु प्रा.बी.व्ही.पवार, प्रभारी कुलसचिव प्रा.ए.बी. चौधरी, परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ.किशोर पवार, प्रा.पी.पी.माहूलीकर, उपकुलसचिव डॉ.शामकांत भादलीकर, अभियंता राजेश पाटील यावेळी उपस्थित होते.   लसीकरणासाठी आरोग्य कर्मचारी प्रशांत पाटील, प्रिती निकम, आशा स्वयंसेविका सपना नन्नवरे, सरला सपकाळे हे उपस्थित होते. यावेळी विद्यापीठातील २०० कर्मचाऱ्यांना कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला.  शिबीराच्या यशस्वीतेसाठी डॉ. किशोर पवार, विद्यापीठ अभियंता आर.आय.पाटील, गिरीष पाटील, अरूण सपकाळे, राजू सोनवणे, प्रमोद चव्हाण, बाळासाहेब पाटील, बलभिम गिरी, मयुर पाटील,पदमाकर कोठावडे, अशोक पाटील, एस.बी.पाटील, महेश मानेकर, इत्यादींनी परिश्रम घेतले. 

 

Protected Content