जळगाव : प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने संलग्न महाविद्यालये व प्रशाळांसाठीचे येत्या शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक जाहीर केले आहे १ सप्टेंबर पासून नव्या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होत आहे.
देशातील कोवीड- १९चा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत महाराष्ट्र शासन व विद्यापीठ अनुदान आयोगाकडून पुढील सूचना प्राप्त होईपर्यंत आनलाईन वर्ग सुरू राहतील . प्रभारी कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन व प्रभारी प्र-कुलगुरू प्रा. बी. व्ही. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या शैक्षणिक सत्राचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
६ आगस्ट पासून पदवी व पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून ३० सप्टेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया आनलाईन/ आफलाईन पद्धतीने पूर्ण केली जाईल. नवीन शैक्षणिक सत्राच्या परीक्षा १३ डिसेंबर २०२१ ते १५ जानेवारी २०२२ दरम्यान घेतल्या जातील. १७ ते २३ जानेवारी २०२२ दरम्यान पुढील सत्राच्या तयारीचा कालावधी असेल. त्यानंतरचे सत्र २४ जानेवारी २०२२पासून सुरू होईल. या सत्राच्या परीक्षा १ मे २०२२ ते ५ जून २०२२ या कालावधीत होतील. ६ जून ते १५ जून दरम्यान पुढील सत्राच्या तयारीचा कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतर १६ जून २०२२ पासून पुढील नव्या शैक्षणिक वर्षाला सुरूवात होणार आहे.
=======================================================
त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांच्या हत्येचा प्रयत्नात तिघांना अटक
त्रिपुरामध्ये गुरुवारी एक मोठी घटना घडली, जिथे एक कारने मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांच्या सुरक्षा दलाला धडक दिली. नंतर ती गाडी पायी चालत असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या अगदी जवळून गेली. या घटनेत मुख्यमंत्री बचावले, पण त्यांचे सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्रिपुरा पोलिसांनी तीन जणांना अटक केली. यासह मुख्यमंत्र्यांच्या हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीटीआयच्या वृत्तानुसार, गुरुवारी सायंकाळी मुख्यमंत्री पूर्ण सुरक्षेसह श्यामा प्रसाद मुखर्जी लेनवर संध्याकाळी फिरायला गेले होते. हे ठिकाण त्याच्या निवासस्थानाजवळ आहे. मग एक कार तिथल्या सुरक्षा वर्तुळात शिरली. ती गाडी मुख्यमंत्र्यांच्या दिशेने येत होती, पण मुख्यमंत्र्यानी उडी मारली आणि बाजूला झाले. यामुळे त्यांना इजा झाली नाही, परंतु त्यांच्या एका सुरक्षा कर्मचाऱ्याला किरकोळ दुखापत झाली.
पोलीस अधिकारी म्हणाले की ही घटना कोविड नाईट कर्फ्यू दरम्यान घडली आणि तीन तरुणांनी केवळ कर्फ्यू नियमांचे उल्लंघन केले नाही तर बेकायदेशीरपणे सहा पोलीस बॅरिकेड्स देखील ओलांडले. या तीन मद्यधुंद तरुणांना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी एका पोलिसावर हल्ला केला.