जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विविध अभ्यास मंडळांच्या बैठकांना १२ मे पासून प्रारंभ झाला आहे.
१२ मे ते १६ मे या कालावधीत विविध विद्याशाखांच्या अभ्यास मंडळाच्या बैठका होणार आहेत. शुक्रवार दि. १२ मे रोजी विज्ञान अभ्यास मंडळाच्या बैठका झाल्या. सर्व अभ्यास मंडळाच्या सदस्यांना कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांनी मार्गदर्शन केले. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून लागू होणा-या नवीन शैक्षणिक धोरणाविषयीची सविस्तर माहिती कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी दिली. विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ. एस. एस. राजपूत यांनी देखील विज्ञान अभ्यास मंडळाच्या सदस्यांशी संवाद साधला. कुलसचिव डॉ. विनोद पाटील देखील यावेळी उपस्थित होते. अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे यांनी आभार मानले. शनिवारी अभियांत्रिकी व फार्मा, सोमवारी वाणिज्य व व्यवस्थापन आणि आंतरविद्याशाखा तसेच मंगळवार दि. १६ मे रोजी मानव्यविद्या शाखेतील विविध अभ्यास मंडळाच्या बैठका होणार आहेत.