उभ्या ट्रकमधून ५ लाख रूपये किंमतीचा शेंगदाण्यांचा मुद्देमाल लांबविला

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | चाळीसगाव- मेहूणबारे रस्त्यावरील एका पेट्रोल पंपाजवळ उभा असलेला नादुरुस्त ट्रकमधून ५ लाख १८ हजार रुपयांचा शेंगदाण्याने भरलेला कट्टा चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, चाळीसगाव – मेहूणबारे रस्त्यावरील नायरा पेट्रोल पंपाजवळ नादुरुस्त होऊन ट्रक (एम.एच.१८ ए.ए. ०९६३) हा उभा होता. त्यात ५ लाख १८ हजार सातशे रूपयांचा शेंगदाणे होता. एकूण ९१ कट्टात शेंगदाणे हे भरलेले होते. मात्र अज्ञाताने ट्रकच्या मागच्या बाजूला असलेली दोरी तोडून व ताडपत्री फाडून वरील किंमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर घटना हि १० रोजी रात्री ३ ते दुपारी २:३० वाजताच्या सुमारास घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रविंद्र जगन्नाथ जाधव रा. धुळे यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोहवा दत्तात्रय महाजन हे करीत आहे.

Protected Content