जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या मान्यता प्राप्त परिसंस्था आणि प्रशाळेच्या प्रवेशित विद्यार्थ्यांची चालू शैक्षणिक वर्षाच्या परिक्षा केवळ ऑनलाईन पध्दतीने परिक्षा ५ जानेवारीपासून सुरू होत असल्याची माहिती विद्यापीठाचे परीक्षा व मुल्यमापन केंद्राचे संचालक बी.पी.पाटील यांनी कळविले आहे.
विद्यापीठाने ५ नोव्हेंबर, २०२० च्या पत्रान्वये वरील परीक्षा ऑफलाईन पध्दतीने घेण्याबाबत महाविद्यालयांना कळविले होते. तसेच २८ डिसेंबरपासून काही अभ्यासक्रमांच्या पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतू कोरोना प्रादूर्भाव विचारात घेऊन विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा ऑनलाईन पध्दतीने ५ जानेवारीपासून सुरु होणार आहेत. विद्यार्थ्यांना सॉफटवेअरच्या हाताळणी व सरावाकरीता सराव चाचणीचे आयोजन करणे आवश्यक आहे. याकरीता २८ डिसेंबरपासून होणाऱ्या परीक्षा ५ जानेवारीपासून सुरु होतील. सुधारित वेळापत्रके विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहिर करण्यात येणार आहेत. सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी असे विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन केंद्राचे संचालक बी.पी.पाटील यांनी कळविले आहे.