जळगाव : प्रतिनिधी । बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवी. पदविका व पदव्युत्तर अभ्यास्क्रमाच्या अंतिम वर्ष परीक्षा १२ ऑक्टोबर पासून सुरळीत सुरु झाल्या.
पहिल्याच दिवशी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ७० टक्के विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे ऑनलाईन परीक्षा दिली. लॉगइन झालेला कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून बंचित राहीला नाही. अंतिम वर्षाच्या या परीक्षा १२ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत होत आहेत. ५३ हजार ५६४ विद्याथ्यांनी नोंदणी केली आहे.
ऑनलाईन परीक्षेसाठी ३९ हजार २० विद्यार्थानी तर ऑफलाईन परीक्षेसाठी १४ हजार ४७४ विद्याथ्यांनी पर्याय निवडला आहे. आज पहिल्या दोन सत्रातील परीक्षांमध्ये २३ हजार ९९१ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली. ऑफलाईन परीक्षेची आकडेवारी सायंकाळी उशिरापर्यंत प्राप्त शाली नव्हती. ऐनवेळी
ऑफलाईनच्या विद्यार्थ्यानी ऑनलाईन परीक्षेचा पर्याय निवडल्यामुळे ही आकडेवारी मिळू शकली नाही. काही ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांनीही ऑफलाईनचा पर्याय निवडला.
सायंकाळी ५ वाजेपर्यंत २१३ विषयांसाठी २३ हजार ९९१ विद्याथ्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली. ऑफलाईनसाठी जळगाव , धुळे व नदुरबार या तिनही जिल्ह्यात १०९ परीक्षा केंद्र होते. सोयीने परीक्षा केंद्र निवडीची मुभा देण्यात आली होती. परीक्षा केंद्रावर परीक्षा हॉलमधे जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या तापमानाची इनफ्रारेड थर्मामीटरद्वारे तपासणी केली जात होती हातावर सॅनिटायझर टाकून मगच प्रवेश दिला जात होता, परीक्षा हॉलमध्ये क्षमतेच्या ५० टक्के विद्यार्थ्यांनी बसण्याची व्यवस्था केलेली होती.
सकाळी कुलगुरू प्रा. पी.पी. पाटील व जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मुळजी जेठा महाविद्यालयाला भेट देवून पाहणी केली. यावेळी सिनेट सदस्य प्रा. अनिल पाटील, विष्णू भंगाळे , मनिषा चौधरी उपस्थित होते. प्राचार्य एम.एन. भारंबे यांनी माहिती दिली. नंतर कुलगुरू प्रा. पी.पी. पाटील यांनी आय एम आर. व बेंडाळे महिला महाविद्यालयाला भेट देवून पाहणी केली. मायंकाळी त्यांनी धरणगाव व एरंडोल येथील परीक्षा केंद्रांनाही भेटी दिल्या.
. विद्यार्थी परीक्षा केंद्रावर उशिरा आला तरी परीक्षेला बसू दिले गेले. ऑनलाईन परीक्षेबाबतही विद्यापीठाने तीन तासांचा बिटो कालावधी दिल्यामुळे ज्यांना अडचणी येत होत्या त्या दूर झाल्या. प्रारंभीच्या तासाभरातच साडेपाच हजार विद्यार्थ्यांनी सोडलेला पेपर सबमिट केला होता, ऑनलाईन परीक्षेत तांत्रिक अडचणी तात्काळ वॉर रुममधील प्राध्यापकांनी सोडवल्या प्रा. के.एफ. पवार वॉर रुममध्ये समन्वयक व त्यांच्यासोबत डॉ. नवीन पंडी. डॉ. अमरदीप पाटील, डॉ. पी.टी. आगे, प्रा. मनोज पाटील, मनोज निळे , दिलीप लोहार हे काम करीत आहेत.
विद्यापीठाने तीनही जिल्हयासाठी देखरेख समित्या नियुक्त केल्या आहेत. या समिती सदस्यानी त्यांना दिलेल्या तालुक्यांमधील परीक्षा केंद्रांना भेटी देवून पाहणी केली. या समितीमध्ये दीपक पाटील, दिनेश नाईक, अमोल पाटील, वर्षा मानवतकर, डॉ. अनिल पाटील, डॉ. के. जी. कोल्हे, विष्णू भंगाळे, मनिषा चौधरी, प्रा. नितीन गरी, प्रा. एकनाथ नेहते, प्रा. नितीन शाटे, प्रा. पी.पी. जंगले, प्रा. मोहन पावरा, विवेक लोहार, अमोल मराठे. अमोल गोनवणे, डॉ. पी.बी. अहिरराव, डॉ. गौतम कुवर, डॉ.एम.एम.जोगी आदींचा समावेश आहे.