जळगाव प्रतिनिधी । गेल्या आठवड्यापासून विद्यापीठीय आणि महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी लेखणी बंद आंदालन सुरू आहे. या आंदोलनाला भाजपाचे आमदार राजूमामा भोळे यांनी पाठींबा जाहीर केला आहे.
गेल्या सात दिवसांपासून विद्यापिठीय व महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला ३० सप्टेंबर रोजी जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे यांच्या जाहीर पाठिंब्याचे निवेदन भारतीय जनता पार्टी आणि भाजयूमो तर्फे महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठ सेवक संयुक्त कृती समितीला देण्यात आले. केंद्र शासनाच्या धरतीवर राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना यापूर्वीच सातवा वेतन आयोग लागू केला असून राज्यातील अकृषी विद्यापीठ साठी सातव्या वेतन आयोगाची अधिसूचना, सेवातर्गत आश्वासीत प्रगती योजनेचे रद्द झालेले शासन निर्णय, पुनर्जीवित केल्याचे शासन निर्णय व १०, २० व ३० वर्षाच्या सेवेनंतरची तीन लाभाची योजना लागू झाल्याच्या शासननिर्णय निर्गमित होत नाही, अशा विविध मागण्यासाठी कृती समितीचे राज्यव्यापी आंदोलन सुरु आहे. त्याच अनुसंघाने कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ येथे उ.म. विद्यापीठ शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास आ.सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांनी जाहीर पाठींबा दिला. या प्रसंगी भाजपा युवा मोर्चा जिल्हा महानगर अध्यक्ष आनंद सपकाळे, सरचिटणीस अक्षय जेजुरकर, मिलिंद चौधरी, जयंत चव्हाण उपस्थित होते.