देवेंद्र फडणवीसांकडे मोठी जबाबदारी; बिहार निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती

मुंबई प्रतिनिधी । राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजपकडून मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बिहार विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाने देवेंद्र फडणवीस यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली. पक्षाने आज अधिकृतपणे प्रसिद्धी पत्रक जारी करून ही घोषणा केली. पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी २४३ सदस्य असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी जदयू आणि एलजेपीसारख्या मित्रपक्षांसोबत जागावाटपाविषयी चर्चा सुरू आहे.

बिहार विधानसभेच्या निवडणूका तीन टप्प्यात होणार आहेत. पहिल्या टप्प्याचे मतदान २८ ऑक्टोबर, दुसऱ्या टप्प्याचे मतदान ३ नोव्हेंबर आणि तिसऱ्या टप्प्याचे मतदान ७ नोव्हेंबरला होणार असून १० नोव्हेंबरला बिहारचा निकाल स्पष्ट होणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांची प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर बिहार निवडणुका महाराष्ट्रासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत.

दरम्यान, फडणवीस यांची प्रभारी म्हणून नियुक्ती होण्याची चर्चा सुरू होती. यापूर्वी फडणवीस यांनी अनेकदा बिहारचा दौरा केला होता. त्यानंतर त्याची नियुक्तीची चर्चा रंगली होती. फडणवीस यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूकी दरम्यान आपल्या संघटन कौशल्याचा वापर करत सर्वाधिक उमेदवार निवडून आणले होते. त्यामुळं पक्षानं त्यांच्या याच कामगिरीवर खुश होऊन त्यांना हे प्रमोशन दिलं असल्याची चर्चा आहे.

 

 

Protected Content