विदेशी नागरिकांना भारतात येण्याची सूट

नवी दिल्ली: वृत्तसंस्था । केंद्र सरकारने विदेश नागरिकांना भारतात येण्याची सूट दिली आहे. पर्यटक व्हिसा वगळता आता विदेशी नागरिक इतर कोणत्याही कारणासाठी भारतात येऊ शकणार आहेत.

सर्व OCI आणि PIO कार्ड असलेल्या परदेशी नागरिकांना आता भारतात प्रवेश करण्याची परवानगी मिळाली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने अनलॉक-५ अंतर्गत सर्व प्रकारच्या व्हिसांवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला.

उपचारासाठी भारतात येऊ इच्छिणाऱ्यांना आता विदेश मेडिकल व्हिसा मिळण्यासाठी अर्ज करता येणार आहे. भारतातील विदेशी नागरिकांच्या प्रवेशावर भारताने मार्चमध्ये लॉकडाउनची घोषणा करतानाच बंदी आणली होती.

 

Protected Content