Home Cities अमळनेर विज पुरवठा सुरळीत करण्याबाबत निवेदन

विज पुरवठा सुरळीत करण्याबाबत निवेदन

0
37

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरात महावितरणतर्फे सारखा विज पुरवठा खंडित होत असून विज पुरवठा सुरळीत करावा, अशा मागणीचे निवेदन आम आदमी पार्टी अमळनेरतर्फे कनिष्ठ अभियंता मनोज पवार यांना देण्यात आले आहे. अन्यथा मोठ्या आंदोलनाचा पवित्रा घेणार, असा इशारा ही यावेळी देण्यात आला.

आम आदमी पार्टी अमळनेरचे जिल्हा संयोजक प्रा. गणेश पवार, तालुका सचिव नाना पाटील तथा तालुका अध्यक्ष सोशल मीडिया मुकेश राजपूत (जैतपिर) यांनी शेती पंपाचे विज बिल भरून सतत विज कनेक्शन खंडीत होत असते. तरी रब्बी हंगाम पेरणी झाली असुन ऐनवेळी महावितरणकडुन विज खंडीत होत असते व शेती पंपाचे विज बिल भरले असता शेतकरी राजा हा नेहमी नुकसान असो अतिवृष्टी व बे-मोसमी पाऊस यासाठी बळी पडतो. तरी महावितरण विभाग अमळनेर यांना आज दि. 30 नोव्हेंबर (बुधवारी) रोजी निवेदन देण्यात आले. तरी महावितरण अमळनेर यांनी विज खंडित न होता शेतकरी बांधवांनसाठी नियमितपणे विज पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा आम आदमी पार्टी अमळनेर जि. जळगाव मोठ्या आंदोलनाचा पवित्रा घेईल, असा इशारा आम आदमी पार्टी तालुका अध्यक्ष सोशल मीडिया मुकेश राजपूत (जैतपिर) आम पार्टी अमळनेर यांनी दिला आहे.

 

 


Protected Content

Play sound